top of page
  • Writer's picturePanchakarma Chikitsalaya

आत्तापर्यंतची वाटचाल..

पंचकर्म चिकित्सालय

२५ जानेवारी, १९८८ रोजी आत्मविश्वासाने आणि गुरुवर्य वैद्य मा.वा.कोल्हटकर यांच्या आशीर्वादाने आयुर्वेद विश्वात पाऊल टाकले. पुस्तकी ज्ञान किंवा ग्रंथ वाचन आणि महाविद्यालयीन शिक्षण हे व्यवसाय सुरु करायला पुरेसे नाही. त्यासाठी हवा असलेला प्रत्यक्ष अनुभव हा गुरूमुळे मिळतो. आपल्या ज्ञानाबद्दल जर खात्री असेल तरच धाडस करण्यासाठी पूल पुढे पडते. या प्रत्यक्ष अनुभवाची शिदोरी बरोबर घेऊनच व्यवसाय सुरु झाला.


तो काळ तसा खडतरच होता. नवे नवे रुग्ण येण्यासाठी खूप वाट बघावी लागे. पण जसा रुग्णांना चांगला नुभव येऊ लागला तशी वात बघण्याची वेळ रुग्नानावर येऊ लागली. समोर ध्येय एकाच होते : “आयुर्वेद प्रधान चिकित्सा हवी. आणि त्यासाठी आयुर्वेदाचा प्रसार-प्रचार.” त्यामुळे प्रत्येक रुग्ण हा आपला अभ्यासाचा आणि परिक्षेचा एक एक प्रश्न आहे असे समजून चिकित्सा केली आणि व्यवसाय वाढतच गेला.. त्यातूनच, जे क्षेत्र आयुर्वेदात थोडे दुर्लक्षित राहिले गेले होते ते हळू हळू बाळसे धरू लागले – ते म्हणजे “भग्न चिकित्सा-Fractures and dislocation” आणि “ आत्ययिक चिकित्सा-Emergencies”. ‘आयुर्वेद हा फक्त संधिवात आणि दमा यासारख्या रोगांना उपयोगी आहे, गुण येण्यासाठी खूप वेळ लागतो’ हे दोन्ही गैरसमज आज पंचकर्म चिकित्सालयामुळे दूर झालेले आहे. हेच व्यवसायाच्या यशाचे द्योतक आहे. आज मितीला अनेक accidents, fractures, न भरून येणाऱ्या जखमा, ICU मधील पेशंट, वंध्यत्वाचे रुग्ण यांचे पंचकर्म चिकित्सालय हे विश्वासाचे आणि आश्रयाचे स्थान आहे.


हा ३०-३२ वर्षांचा काळ नक्कीच सहज सोपा नव्हता. त्यासाठी लागणारे अभ्यास आणि कष्ट तर होतेच पण काम करण्यासाठी विद्यार्थ्यांची, घरच्यांची तसेच अनेक मदतनिसांची साथ खूप मोलाची आहे.

सुरुवातीला घरात १०*१० च्या जागेत सुरु केलेलं पंचकर्म चिकित्सालय आज एका दिमाखदार सुसज्ज जागेत उभे आहे. हळू हळू औषधांचा संग्रह, उपकरणांचा वाढता संग्रह, पंचकर्माच्या आधुनिक सोयी, मदतनीसांची वाढती संख्या, प्रत्येक वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सेसाठी लागणारी साधने, ग्रंथ संग्रह आणि हळूहळू वाढत्या औषधीकरणाचा व्याप ह्यामुळे आता कोल्हटकर सरांचे आणि स्वतंत्र सुसज्ज आधुनिक प्रशस्तचिकित्सालयाचे स्वप्न पूर्ण झाले आहे – होत आहे असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही.233 views0 comments

Comments


bottom of page