मी व रेणु देखिल महेशदादा आजारी होता त्यावेळी तीव्र ज्वर, संधीशूल, तीव्रतम कटीग्रह , कंठशूल-ग्रह व थोडा कास याने पीडित होतो. दरम्यान कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली...
पाहिले दोन दिवस स्वतः औषधे घेतली परंतु उपशय नव्हता. नंतर सरांसोबत फोनवर बोलून सर्व सांगितले, सरांनी त्यानुसार वैदय स्वप्निल यांस सांगून आम्हाला औषधे पाठवली, दोन दिवसांत ज्वर गेला,
दौर्बल्य व कास मात्र होता.
यानंतर पुढे ३ दिवस झोपच नाही, ( मी हव्या त्या वेळेला झोपणारा व्यक्ती, आणि आता ३ दि. अनिद्रा ) झोप लागत नव्हतीच ! त्याचबरोबर एक नवीन व त्रासदायक तक्रार सुरू झाली. रोज रात्री संपूर्ण डोक्याचा भाग थंडगार पडत होता, इतका की कानटोपी, ब्लॅकेट गुंडाळून ठेवत होतो व दूसरीकडे मात्र दोन्ही संपूर्ण पाय व तळवे यांचा मात्र तीव्र दाह, दाह इतका की ओला कपडा गुंडाळून रात्री ३-४ वेळा बदलून ठेवावा लागत होता.. डोके घरात व पाय बाहेर गॅलरीत राहतील असा झोपत होतो.... पण झोप काही लागत नसे, परीणामी दौर्बल्य वाढत होते...
यानंतर मात्र सरांनी औषधे बदलून दिली,
दोन वेगवेगळया प्रकारचे सिद्धजल, कपाळावर व नाभी स्थानी लेप व अभ्यंतर औषधी, स्वप्निल करवी पुनः पाठवले,
त्याच दिवशी रात्री इतका छान झोपलो, सकाळी बराच बरा झालो... यानंतर वरील तक्रार पुन: उद्भवली नाही... पुढे १५ दिवस नियमित औषधे घेतली...
यात शारीर दोषांसाठी औषध चालू होतेच पण त्याबरोबर मानाला उभारी / आधारासाठी एक मोठे औषध रोज सकाळी घरपोच येत होते...
रोज नित्य नियमाने सरांचा व स्वप्निलचा फोन येत होता. आपण कधीतरी / कुणाला रोज स्वतःहून १५ दि. फोन करून चौकशी करा, मग कळेल त्यासाठी किती कष्ट व धीर लागतो... हे तेव्हाच शक्य होते जेव्हा आपण त्या व्यक्तीला आपले समजतो !
सरांचे चौकशी व धीराचे शब्द कानावर पडल्यावर खूप बरे वाटायचे... त्यांच्या या नित्य नियमित धावपळीत आपण त्यांना किती त्रास देतो या भावनेने खूप वाईट वाटायचे.. एक दिवस खळखळून रडून मोकळा झालो, आणि मग पूर्ण बराही झालो...
खरोखर सर - वाहिनी आपण आम्हा सर्वांना एक कुटुंब म्हणून सांभाळतात.
आम्ही सर्व आपल्या माध्यमातून कुठल्या न कुठल्या प्रकारे त्याची फळे खातो , पण ती गोड फळे / सुखं उपलब्ध करून देण्यासाठी तुम्हा उभयतांची किती ओढाताण होते याची
कल्पना न केलेली बरे...
आपल्या सर्वांसाठी संपूर्ण PC8 कुठल्या न कुठल्या माध्यमातून, आपल्या विविध वैयक्तिक / आर्थिक / कौटुंबिक / रूग्णालयीन अडचणींसाठी कायम मदत करतात...
तेव्हा या माध्यमातून / प्रसंगाला धरून मला पुनः सर्वाना विनंती करावी वाटते की आपण सर्वांनी देखिल आपल्या वेळेत वेळ काढून या PC8 चिकित्सालयात रुग्णसेवा देण्यासाठी किंवा असतील त्या अडचणी सोडवण्यासाठी आपआपल्या परीने मदतीचे योगदान दयावे...
🙏...
कारण,
" ..... घेता घेता एके दिवशी देणार्याचे हात घ्यावेत... "
Commenti