Jidnyasa
Vol.1 2022
Vol.2 2023
'जिज्ञासा' मागचा उद्देश
"आपण इतिहासातून काय शिकतो?' आणि या प्रश्नाचे उत्तर म्हणजे 'भविष्य'! पूर्वी घडलेल्या घटनांमधून वर्तमानाचे आणि पर्यायाने भविष्याचे ज्ञान करून घेणे म्हणजेच 'पुढच्यास ठेच मागचा शहाणा पंचकर्म चिकित्सालयातील आधी ठेव खाऊन यशस्वी झालेल्या वैद्यांकडून पुढील पिढीतील विद्याथ्र्यांना अनुभवी धडे मिळावेत हाच 'जिज्ञासा' मागचा हेतु.
पंचकर्म चिकित्सालयाचा 'PC8' नावाचा Whatsapp Group आहे. त्यावर वैद्यगण आपापल्या चिकित्सालयातील विशेष केस मांडत असतात. मग त्यावर तदुविद्य संभाषा होऊन ज्ञानार्जन सुरू असते. तर अशा ह्या विशेष केसेस मोबाईलच्या मेमरी प्रमाणेच काळाच्या व स्मृतीच्या पडद्याआड जाऊ नयेत म्हणून त्या लिखित स्वरूपात तसेच Digital Format मध्ये संग्रही ठेवणे अनिवार्य आहे. हे साध्य व्हावे म्हणूनच 'जिज्ञासा' ची निर्मिती झाली. यामध्ये पंचकर्म चिकित्सालयाशी संबंधित वैद्य एखादी रूग्ण केस अगदी विस्तृत स्वरूपात मांडतील आणि तेही अगदी रंगीत छायाचित्रांसह मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत असणान्या या लेखनाला अजिबात शब्द मर्यादा नाही. नियम फक्त एकच केस ही पूर्ण आयुर्वेदिय तत्त्वांवर आधारित हवी आणि निदानपंचक, इतिहास, चिकित्सा तत्त्व, कर्म वृत्तांत, Follow Up इ. सह केस पूर्णतः उलगडलेली असावी. ठराविक एका व्याधीला ठराविक हे औषध देता येते किंवा हे कर्म करता येते यापेक्षा ह्या व्याधीचा संप्राप्तीभंग कुठल्या सिद्धांताने झाला आणि त्यासाठी कुठले चिकित्सातत्त्व अंमलात आणले हे 'जिज्ञासा' मधून शिकायला मिळेल. ती केस जशीच्या तशी वाचकांसमोर उभी राहील हे 'जिज्ञासा' चे वैशिष्ट्य असेल आणि हे वैशिष्ट्य जपण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. जास्तीत जास्त वैद्यांपर्यंत शुद्ध आयुर्वेद पोचावा आणि आयुर्वेदाने काय काय घडू शकते याची कल्पना यावी म्हणून हा छोटासा प्रयत्न !
We Treat
We Teach
We Preach